Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंतुर्ली खु” येथे एकाचा खदानीत बुडून मृत्यू

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली खु येथील ४२ वर्षीय शेत मजुराचा गुरे चरताना खदानीत पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंतुर्ली खु” ता. पाचोरा येथील रहिवाशी प्रकाश बळीराम वाघ (वय – ४२) हे शेतमजुरी करुन आपल्या कुटुंबियांचा गाडा चालवत होते. गेल्या चार दिवसांपासून ते गावातीलच प्रभाकर पोपट पाटील यांचे शेतात शेतमजुर म्हणुन काम करत होते. दरम्यान दि. १५ रोजी सकाळी ते गावानजीक असलेल्या पाझर तलावाजवळील सरकारी खदाणी लगत गुरे चारण्यासाठी गेले असता अचानक प्रकाश वाघ हे खदाणीत पडले. त्यावेळी प्रभाकर पाटील यांच्या मालकीचा ४० हजार रुपये किंमतीचा एक बैल सुद्धा पाण्यात पडल्याने प्रकाश वाघ व बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरहु प्रकार हा शेजारी शेळ्या व गुरे चारत असलेले योगेश भारत पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना घटनेबाबत माहिती देताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकाश वाघ व बैल यांना पाण्यातून बाहेर काढले. प्रकाश वाघ यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित करुन शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान बडगुजर हे करीत आहे.

घटनास्थळी भाजपा तालुका सरचिटणीस प्रदिप पाटील, एकलव्य संघटनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष गणेश वाघ, लहुजी शक्ती सेनेचे पाचोरा तालुका अध्यक्ष आबा गायकवाड, जामनेर तालुका अध्यक्ष जीवन मगरे यांनी भेट दिली. मयत प्रकाश वाघ यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुल, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. वाघ कुटुंबातील एक कर्त्या पुरुषाचे अकस्मात निधनाने गावासह परिसरातुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

Exit mobile version