Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथे रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाच्या धडकेत ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जगन्नाथ रघुनाथ मिस्‍तरी (वय-५५) रा. खालची अळी, नशिराबाद ता.जि.जळगाव हे मंगळवार १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथील बसस्थानकाजवळून राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच अज्ञात वाहनधारक वाहन घेऊन पसार झाला होता. याबाबत सुधाकर रामदास जाधव यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.

 

 

 

 

 

Exit mobile version