Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दारणा नदीत बुडून एकाचा मृत्यू

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इगतपुरी तालुक्यातील बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या पती-पत्नी पैकी पतीचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ३१ मे रोजी दुपारच्या सुमरास बोर्ली वाघ्याची वाडी येथील दारणा नदीपात्रात पुनाजी नामा वीर आणि त्यांची पत्नी सखुबाई पुनाजी वीर हे दोघे सोबतच आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पुनाजी नामा वीर हे पोहत असतांना बुडाले. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुनाजी वीर यांचा बुडालेला मृतदेह बाहेर काढला. यानंतर पुढील तपासणीसाठी इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

Exit mobile version