Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेसमोर आल्याने एकाचा मृत्यू

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेसमोर आल्याने ४२ वर्षीय व्यक्तीचा जागीचे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी घडली. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भागवत सोपान नारखेडे (वय-४२) रा. तुळशीनगर, वांजोळा रोड, भुसावळ असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४२२च्या ११ जवळ मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी  भागवत नारखेडे हे धावत्या रेल्वे समोर आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर भुसावळ रेल्वे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मयताची ओळख पटविली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून भुसावळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाथरवट करीत आहे.

Exit mobile version