Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वेखाली एकाची आत्महत्या

dead body jalgaon

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग पुलाच्या पुढे आज सकाळी रेल्वेखाली एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास बजरंग पुलाच्या थोडे पुढे रेल्वे रूळांवर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधीत व्यक्ती हा सुमारे ६५ ते ७० वर्षे वयाचा असल्याचा अंदाज आहे. याबाबत अनेक तास उलटून गेल्यानंतरही मृतदेह तसाच पडून असल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान, सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास पाचोऱ्याकडून जळगावला येणाऱ्या एका मालगाडी खाली या अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केली. चालकाने स्टेशन मास्तरला संबंधित घटनेची माहिती दिली होती.

Exit mobile version