Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चित्रा चौकात आयशरने एकाला चिरडले

chitra chauk accident

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चित्रा चौकात आयशरने एका व्यक्तीला चिरडल्याची दुर्घटना आज सायंकाळी घडली.

याबाबत एमएच ०४ डीडी ६४५३ या क्रमांकाच्या आयशरने आज सायंकाळी एमएच१९-डीबी ४०४८ या क्रमांकाच्या दुचाकीस्वाराला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आयशरचालकाने पळ काढल्याची माहिती आहे.दरम्यान, ताजे वृत्त हाती आले तेव्हा मृत व्यक्ती हे अनिल श्रीधर बोरोले (रा. पोस्टल कॉलनी, जळगाव) असून त्यांचा मृतदेह बराच वेळ चित्रा चौकात पडून होता. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावर उपस्थित असणार्‍यांच्या माहितीनुसार दुचाकीस्वाराचा तोल गेल्यामुळे ते खड्डयात पडले. यानंतर मागून आलेली आयशर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने अक्षरश: त्यांचा चेंदामेंदा झाला.

वाहतूक पोलिसांचा असंवेदनशीलपणा

ही दुर्घटना चित्रा चौकातील नारायण इलेक्ट्रीकल्स या दुकानासमोर घडली. याच्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस उभे होते. मात्र तब्बल २५ मिनिटांपर्यंत हे पोलीस मृतदेहापर्यंत आले नाही. यामुळे उपस्थितांनी संताप व्यक्त केला.

सामाजिक कार्यात अग्रेसर

उद्योजक अनिल श्रीधर बोरोले हे समाज कार्यात अग्रेसर होते. ते रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष होते. तर जळगाव जिल्हा लेवा पाटीदार मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत. तर औद्योगिक वसाहतीत द्वारका इंडस्ट्रीजचे ते संचालक होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version