Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धरणगाव येथे स्पर्धा परीक्षा विषयनिहाय एक दिवसीय कार्यशाळा

धरणगाव प्रतिनिधी । महाराजस्व अभियान अंतर्गत धरणगाव तहसील कार्यालय येथे स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार प्रथमेश मोहोड, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळेतून चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले.  जेणेकरून विद्यार्थ्यांना कोठेही बाहेर जाण्याची गरज भासणार नाही व    धरणगाव तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने स्पर्धापरीक्षेच्या क्षेत्रात उमेदवार यशस्वी होतील. अशा स्वरुपाचा महाराजस्व अभियान अंतर्गत राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले. 

कार्यशाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन लाभावे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्याचा मानस असल्याचे तहसीलदारासह इतर अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी नवमतदारांनी मतदान नोंदणी  करावी असे आवाहन करण्यात आले. यासाठी तहसील कार्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आठ नंबर फार्म भरून देण्याचे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Exit mobile version