Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

६ सप्टेंबरला प्रशासन अभियंत्यांचा “एकदिवसीय लाक्षणिक संप”

खामगाव प्रतिनिधी । वीज वितरण कंपनीच्या महावितरण, महापरेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपनीचे प्रशासन अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत नाराज असल्यामुळे येत्या ६ सप्टेंबर रोजी एक दिवशीय लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निर्णय न झाल्यास संप बेमुदत करण्याचा निर्णय संघटनेने घेतला असल्याची माहिती सबऑर्डिनेट इंजि. असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकुर यांनी दिली.

वीज वितरण कंपनीतील कर्मचारी  कोविड महामारी असो किंवा वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देण्यासाठी आपल्या कर्मचारी सहकान्यांसोबत जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करीत आहेत. परंतू तिन्ही कंपनीचे प्रशासन अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उदासिन असल्याचे सातत्याने संघटनेला दिसत आहेत. संघटनेच्या वेळोवेळी प्रशासनासबोत चर्चा झालेल्या आहेत. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे संघटनेला संपासारखे अंतिम हत्यार उचलण्यापासून पर्याय उरलेला नाही.

त्यामुळे तिन्ही क्षेत्रातील सर्व अभियंत्यांनी नाईलाजास्तव ६ सप्टेंबर २१ रोजी एक दिवसीय लाक्षणिक संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आंदोलन काळामध्ये वीज अभियंते राज्यातील जिल्हास्तरीय कार्यालय, निर्मिती केंद्रे व उपकेंद्रे येथे निदर्शन करणार असून अतिरिक्त कार्यभारसुद्धा सोडणार आहेत. मागण्यांबाबत अपेक्षित निर्णय न झाल्यास सदरचा संप बेमुदत करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. अशी माहिती सबऑर्डिनेट इंजि. असोसिएशनचे सरचिटणीस संजय ठाकुर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Exit mobile version