Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्षुल्लक कारणावरून पिंप्री येथे एकाला बेदम मारहाण

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री येथील ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीला क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सकाळी उघडकीला आली. मारेकरी सहा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुखदेव प्रभाकर सपकाळे (वय-५०) रा. पिंप्री ता. यावल हे शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास गावातील वडाच्या झाडाखाली उभे होते. मारहाण केल्याचा जाब विचारात संशयीत आरोपी पुंडलिक सपकाळे, सुकदेव गबा सपकाळे, भास्कर पुंडलीक सपकाळे, धमेन्द्र पुंडलीक सपकाळे, विजय पुंडलीक सपकाळे आणि एक महिला सर्व रा. पिंप्री ता. यावल यांनी सुकदेव सपकाळे यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. तर यातील पुंडलीक सपकाळे याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांडाने सुकदेव सपकाळे यांच्यासह त्यांची पत्नी व चुलत भाऊ यांना बेदम मारहाण केली. यावल ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सुकदेव  सपकाळे यांनी यावल पोलीसात तक्रार‍ दिली. त्यांच्या तक्रारीवरून  संशयीत आरोपी पुंडलिक सपकाळे, सुकदेव गबा सपकाळे, भास्कर पुंडलीक सपकाळे, धमेन्द्र पुंडलीक सपकाळे, विजय पुंडलीक सपकाळे आणि एक महिला सर्व रा. पिंप्री ता. यावल यांच्यावर यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या सर्वांना यावल पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अशोक जवरे हे करीत आहे .

Exit mobile version