Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी पिस्तूल आणि २ जीवंत काडतूसासह एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी नगर हुडको परिसरात गावठी पिस्तूल आणि दोन जीवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या संशयिताला जळगाव शहर पोलीसांनी रविवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशवंत नामदेव पाटील (४७, रा. शिवाजीनगर, हुडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर हुडको परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती रविवारी २९ ऑक्टोबर रोजी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुपारी ४ वाजता पोहेकॉ उमेश भांडारकर, पोकॉ तेजस मराठे, योगेश इंधाटे, अमोल ठाकूर हे तेथे पोहचले असता. त्या ठिकाणी यशवंत पाटील हा मद्याच्या नशेत गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचे आढळून आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन जीवंत काडतूसदेखील सापडले. कट्टा व काडतूस जप्त करून या इसमाला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोकॉ योगेश इंधाटे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.

Exit mobile version