Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजंदा येथील चोरी प्रकरणी एकाला अटक

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील अजंदा येथे एका बंद घराचे कुलुप खोलून कपाट फोडून सुमारे साडे आठ हजाचा  मुद्देमाल चोरुन नेल्या प्रकरणी रावेर पोलिसांनी एकास अटक केली आहे

या बाबत वृत्त असे की रावेर तालुक्यातील  अजंदा येथे राहणार्‍या योगिता चंदनकर आपल्या राहत्या घराला कुलुप लावून बाहेर गेल्या होत्या. यावेळी एकाने घराचे कुलुप खोलून कपाट तोडून कपाटामध्ये असलेले सहा हजार रोख अडीच हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असे एकूण आठ हजार ५०० रुपये चोरुन नेले म्हणून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत जगदीश बिरपन यास ताब्यात घेतले आहे. या गुन्हाचा तपास पो. नि. अवतारसिंग चव्हाण, सपोनि शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र नारेकर करीत आहेत.

Exit mobile version