Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीसांना धक्काबुक्की करणाऱ्या महिलेसह एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पळून जाण्यास सहकार्य करत पोलीसांशी धक्काबुक्की केल्याची घटना शहरातील तांबापूरा परिसरात घडली होती. त्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या महिलेसह एकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तांबापूरा परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली हा आई, भाऊ आणि बहिणीसोबत वास्तव्याला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी गुन्हेगार इश्तीयाक अली याला पोलीसात हजर करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार गुरूवारी १० ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ अल्ताफ पठाण, राहूल रगडे, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, महिला पोलीस नाईक निलोफर सैय्यद हे तांबापूर येथे गेले. त्यावेळी पोलीसांना पाहून इश्तीयाक अली याची आई हसीना राजीक अली हिने पोलीसांना शिवीगाळ केली. तर त्याच्या सोबत राहणारा अनिस पटेल आरडाओरड करत पोलीसांना धक्काबुक्की केली.  पोलीसांशी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी  हसीना राजीक अली,  अनिस पटेल सर्व रा. तांबापूरा यांना ताब्यात घेतले आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version