Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुन्हा एकदा तारखेत बदल – म्हाडा परीक्षा आता ३१ जानेवारीपासून ऑनलाईन

मुंबई वृत्तसंस्था | म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी असलेल्या जीए सॉफ्टवेअर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आल्यामुळं रद्द करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून ७ फेब्रुवारीपासून सुरु होणारी परीक्षा आता ३१ जानेवारीपासून ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी आता विविध परीक्षा घेण्याचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली असून या परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला असून ५६५ पदांसाठी ७ फेब्रुवारीपासून ऑफलाईन होणारी ही परीक्षा आता ३१ जानेवारीपासून ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ३१ जानेवारी आणि २,३,७,८,९ फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे.

दि.२२ जानेवारीपासून ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर २६ जानेवारीपासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version