Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून तीन महिलांनी सव्वा तीन लाखांचे दागिने लांबविले

जळगाव/चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून अज्ञात तीन महिलांनी ज्वेलर्स दुकानातून तब्बल ३ लाख २० हजार रूपये किंमतीचे ७ दागिने चोरून नेल्याची घटना चाळीसगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, राजेंद्र रमेश वर्मा वय ४२ रा. रथगल्ली चाळीसगाव यांचे राजरत्न ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १४ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता त्यांच्या दुकानावर तीन अनोळखी महिला दुकानात आल्या. दागिने खरेदी करण्याचे सांगून त्यांनी सोन्याचे व चांदीचे दागिने पाहत असतांना हातचालाखी करत तीन महिलांनी जवळपास ३ लाख २० हजारांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमची चोरी केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहे.

Exit mobile version