Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला दिनानिमित्त ‘भक्ती महिला मंडळा’तर्फे महिला पदाधिकार्‍यांचा सन्मान

जळगाव, – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शहरातील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित ‘भक्ती महिला मंडळा’तर्फे महिला पदाधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

श्रीमती मनोरमाबाई जगताप मंगल कार्यालयात मंगळवार, दि. ८ मार्च रोजी सर्व महिला पदाधिकारी, नव्याने स्थापन झालेल्या श्रद्धा महिला मंडळाच्या पदाधिकारी तसेच शिंपी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांनी दीपप्रज्वलन करून संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी भक्ती महिला मंडळातर्फे महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांचा सत्कार करण्यात आला.

महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री महाजन यांच्या हस्ते भक्ती महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी याप्रसंगी भक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा निकुंभ, उपाध्यक्षा आशा जगताप, विद्या जगताप, प्रतीक्षा मेटकर, उषा बाविस्कर, रजनी संधानशिव, शोभा जगताप, नेहा जगताप, निर्मला सोनवणे यांच्यासह श्रद्धा महिला मंडळाच्या अध्यक्षा नेहा जगताप यांच्यासह शिंपी समाजातील महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Exit mobile version