Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ऋषीपंचमीनिमित्त पाटण्यात उसळली भाविकांची गर्दी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी| तालुक्यातील पाटणा येथील चंडिका मंदिराच्या परिसरात आज ऋषीपंचमीनिमित्त लक्षणीय महिला भाविकांनी गर्दी करून पूजा केली. मात्र यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांसह वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

तालुक्यातील पाटणा येथील चंडिका मंदिराच्या परिसरात काल रोजी ऋषीपंचमीनिमित्त लक्षणीय महिलांनी हजेरी लावत पूजन केले. दरवर्षीप्रमाणे यंदाची गर्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान यावेळी अनुचित प्रकार घडू नये व वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांसह वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आणि महिलांना सुरळीत दर्शन घडवून आणले. यामुळे वन्यजीव विभागासह पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे सर्व ठिकाणाहून कौतुक करण्यात येत आहे.

यासाठी सहायक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सपोनि तुषार देवरे, डि. के. जाधव वनपाल (प्रभारी- वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) चाळीसगाव ), ऋत्विक तडवी (वनरक्षक पाटणा), अशोक मोरे (विशेष वनरक्षक पाटणा), उमेश सोनवणे (मुख्य गेट पाटणा वनरक्षक ) तसेच सर्व रोजंदारीवरील वनमजुर आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version