Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव व डॉ वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरवातीस व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निलिमा वारके उपस्थित होत्या.

याप्रसंगी डॉ. प्रशांत वारके यांनी  विद्यार्थ्यांना सांगितले की, संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक व अभ्यासक होते. त्यांचे विचारही खूप महान होते. जीवन जगण्याची कला त्यांच्या महान विचारांमध्ये दडलेली आहे. अत्यंत प्रतिकूल व खडतर परिस्थिती मध्ये त्यांनी शिक्षण घेतले.  त्यांना वाचनाची खूप आवड होती. संविधान बनविण्यापूर्वी त्यांनी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. त्यांच्या महान विचारांमधून आपण सर्वजण प्रेरणा घेऊ शकतो.  डॉ बाबासाहेब यांच्या आयुष्याशी संबंधित महत्वाच्या कार्याविषयी त्यांनी माहिती दिली.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूमिका नाले या विद्यार्थिनीने व आभार प्रदर्शन कोमल साईंकर या विद्यार्थिनीने केले.

यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version