Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिपावलीच्या पूर्वसंध्येला बांभोरी प्र.चा. येथे गर्भवती मातांची आरोग्य तपासणी

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांभोरी प्र.चा.  येथे दीपावलीच्या पूर्वसंधेला समता फौंडेशन,मुंबई व चांदसर आरोग्य केंद्र अंतर्गत बांभोरी प्र चा उपकेंद्र, व बांभोरी प्रचा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी  व औषधोपचार शिबिर व प्लास्टिक मुक्त भारत अभियानचे आयोजन शुक्रवार दि. २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

 

समता फौंडेशन,मुंबई व तसेच बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील कुपोषित मुले,अति जोखमीच्या गर्भवती माता,महिला यांची आरोग्य  तपासणी करण्यात आली. कुपोषित बालकांना व गर्भवती मातांना समता फौंडेशन आणि बांभोरी प्र चा उपकेंद्र तर्फे मोफत औषधोपचार करण्यात आले.

बांभोरी गावातील गर्भवती माता व मुलांना दिवाळीत सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी ग्रामपंचायत व उपकेंद्र तर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील असे मत बांभोरी प्रचा चे सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजीबाबत व महिलांना होणाऱ्या स्तनाचा,गर्भाचा व इतर कर्करोग बद्दल आरोग्य अधिकारी डॉ. प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले .

तसेच समता फौंडेशन,मुंबईचे राजेंद्र दोंड यांनी समता फौंडेशन च्या ग्रामीण भागातील कुपोषित बालक व गर्भवती माताच्या आरोग्यासाठी कार्यतत्पर राहील माहिती दिली.त्याचप्रमाणे दिवाळी पूर्व कवियत्री उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथील समाजकार्य मार्फत शासनाच्या प्लास्टिक मुक्त भारत अंतर्गत गावातील नागरिकांना मोफत कागदी पिशव्यांचे वाटप ही करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य .संदीप कोळी, MPW प्रशांत पाटील, ANM प्रीती निकम, आशा सेविका सपना नन्नवरे, अंजना नन्नवरे, ज्योती सोळंके, सोनी नन्नवरे, अंगणवाडी सेविका, चमेला भालेराव, आशा बाविस्कर, रंजना नन्नवरे व विद्यापीठ प्रतिनिधी अक्षय महाजन, गावातील युवक-युवती महिला व बालक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version