Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनंत चतुर्दशीला शहरात प्रथमच शिवकालीन विद्येचे चित्तथरारक प्रयोग

रावेर  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनंत चतुर्दशीला शिवकालीन विद्येचे चित्तथरारक खेळ विद्यार्थिनीमार्फत सादर केले जाणार आहे. शहरात या कलेचा प्रथमच प्रयोग संपन्न होणार आहे.

येथील प्रशिक्षक युवराज माळी यांच्या माध्यमातून शिव, फुले मर्दानी आखाड्यात, शिवकालीन दांडपट्टा, लाठीकाठी, तलवार बाजी, भाला चालविणे, कुऱ्हाड चालविणे तसेच आगीचे चित्तथरारक खेळ आदी कला व विद्येचा प्रचार व प्रसार होत या शिवकालीन विद्या विद्यार्थिनीनी अवगत केल्या आहेत.

मुक्ताईनगर येथे गुरुवार, दि. ०९ सप्टेंबर रोजी सायं.४ वाजता अनंत चतुर्दशीला या कलेचा प्रथमच प्रयोग होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते संपन्न होणार आहे.

गणपती विसर्जनानिमित अनंत चतुर्दशीला सायं.४ वाजता मुक्ताईनगर नगरसेवक संतोष मराठे यांनी या या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शहरातील प्रवर्तन चौक, मुक्ताई गणेश मित्र मंडळ शिवरायनगर प्रभाग क्र.१२, आय.सी.आय.सी.आय बँकेसमोर, जूनेगाव नाका, फ्रेंडस युवक मंडळ, श्री कॉलनी या ठिकाणी प्रात्यक्षिके होणार असून नागरिकांनी या प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आलं आहे. 

Exit mobile version