Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यात जोरदार भांडण

Untitled 1 copy

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या आठवड्यात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती या दोन्ही नेत्यांना हरि निवास महल येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. यावेळी भाजपला जम्मू-काश्मीरच्या राजकारणात शिरकाव करू दिल्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले आणि ते इतके विकोपाला गेले की अब्दुल्ला यांना तेथून अन्यत्र हलवण्यात आले.

 

ताब्यात घेतलेले असताना उमर अब्दुला यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आगपाखड केली. मेहबूबा यांचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 2015 आणि 2018 मध्ये भाजपाशी आघाडी केल्याने भाजपा राज्यात पाय रोवू लागली. या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार धुमचक्री पाहायला मिळाली. त्यावेळी तिथे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. पीडीपी चीफ मेहबूबा मुफ्ती यांनीही अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिले. अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला यांनीही अटल बिहारी वाजपेयी सरकारसोबत एनडीएत जाणे पसंत केले होते. दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे अखेर ओमर अब्दुल्ला यांना महादेव पहाडीजवळ चष्माशाही येथे वन विभाग भवनात हलवण्यात आले आहे. हरि निवासात दोघंही वेगवेगळ्या मजल्यांवर होते. दोघांनाही त्यांच्या पदांनुसार आणि तुरुंगाच्या नियमानुसार जेवण दिले जात आहे.

Exit mobile version