Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

”ऑलम्पिक जागरण” एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । ऑलिम्पिक जागरण समिती व इकरा एच.जे. थीम महाविघालयात यांच्या संयुक्त विद्यमाने ”ऑलम्पिक जागरण” एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाची प्रस्तावना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी त्याच्यां मनोगतात कार्यक्रमाची रूपरेखा सविस्तर पणे मांडली. या कार्यक्रमासाठी टोकीओ जपानमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत निरीक्षक म्हणुण गेलेले अशोक दुधारे यांनी खास उपस्थिती देवून आयोजन समीती व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेस अश्या प्रकारचे कार्यक्रम घेण्याची गरज असल्याची सांगुन आयोजकांचे कौतुक केले. 

या प्रसंगी व्ही. एस. नाईक महाविदयालयाचे प्राचार्य डॉ पी.व्ही. दलालर यांनी सदर कार्यशाळा मिशन 2024 ऑलिंपिक समोर ठेवुन नवोदित खेळाडूंनी प्रेरणा देण्याकरिता ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त महाविदयालयाने असे कार्यक्रम आयोजित करावे. सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून डॉ. अब्दुल करीम सालार यांनी त्यांच्यां मनोगतात खेळाळुंना शोधुन त्यांनां चांगल्या प्रशिक्षणाची सोय करून पुढे नेण्याचा प्रयन्न करायला हवा. आपल्या देशात खुप प्रतीभाशाली खेळाळु आहे. त्यांची शोध घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. तसेच इकरा एस. जे. थीम महाविदयालयचे प्राचार्य डॉ. सयेद सुजाअत अली यांनी ही मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रमाला लाभलेले मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. उदय डोंगरे, महाराष्ट्र शिवछत्रपती अवार्ड प्राप्तांनी ऑलीम्पिक खेळाचा इतिहास त्याची व्याप्ती व आधुनीक ऑलीम्पिक वाटचाल यावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच तलवारबाजी ह्या खेळाचा इतिहास व त्याचा होणारा प्रसार व प्रचार या बाबत माहिती दिली व पुढील ऑलिंपिकसाठी जास्तीत जास्त खेळाळु सहभागी करण्याचा प्रयन्न संघटनेच्या वतीने सुरू आहे, अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.

सदर कार्यक्रमाला नुतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.जे. पाटील यांच्यासह प्रमुख अतिथी उपस्थितीत होते. ऑनलाइन पद्धतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून  खेळाडू, क्रीडा शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक,  प्राचार्य, प्राध्यापक व पालक इत्यादी क्रीडा प्रेमींनी या व्याख्यानमालेला मोठा प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चाँद खान तसेच आभार प्रदर्शन प्रा. उमेश पाटील यांनी केले.  प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा. सुभाष वानखेडे यांनी केला. ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता, कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिनेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच ऑलीम्पिक जागरण समीती, इकरा एस.जे.थीम महाविदयालय, व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर व  नुतन मराठा महाविद्यालय जळगाव कार्यशाळेला संबंधित असलेले सर्वांनी परिश्रम घेतले.

 

 

Exit mobile version