Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोखंड टॉपीने मारहाण केल्याने वृध्द गंभीरजखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील अंजनसोंड शिवारातील शेतात मोबाईमध्ये फोटो काढण्याच्या संशयावरून एका वृध्दाला लोखंडी टॉमीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुर्यकांत बंडू पाटील वय-६३ रा. फुलगाव ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ तालुक्यातील अंजनसोंड शिवारातील शेट गट क्रमांक २६५ मध्ये त्यांचे शेत आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते शेतात असतांना त्यांनी वाल कंम्पाऊंडचे फोटो काढले. दरम्यान शेजारी शेत असलेल्यांना वाटले की ट्रॅक्टरचे फोटो काढल्याचा संशय आला. त्यामुळे सुर्यकांत पाटील यांना शेतातील अशोक रामचंद्र चौधरी, उमेश अशोक चौधरी आणि चेतन अशोक चौधरी सर्व रा. फुलगाव ता. भुसावळ यांनी लोखंडी टॉमीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर सुर्यकांत पाटील यांनी खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर शनीवारी २७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मनोहर पाटील हे करीत आहे.

Exit mobile version