Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओला कार चालकाला जय श्रीराम म्हणण्यासाठी धमकावले

ठाणे प्रतिनिधी । ओला कार चालविणार्‍या चालकाला जय श्रीराम म्हणण्यासाठी धमकावल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

देशात काही दिवसांपासून जय श्रीराम म्हणण्यावरून सुरू असलेल्या घटनांनी वातावरण तणावग्रस्त असतांनाच आता याच प्रकारची घटना ठाण्यातदेखील घडल्याचे दिसून आले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुंब्रा येथील फैसल उस्मान खान (२५) या ओला कार चालकाने रविवारी पहाटे दिव्यातील आगासन रोडवरून परत जाण्यासाठी गाडी सुरू केली. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अशी विचारणा करत खानला शिवीगाळ व मारहाण करण्यात सुरुवात केली. यासोबत त्याला जय श्रीराम म्हणण्यास धमकावले. यामुळे त्याने सोमवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सूत्रे फिरवरून मंगेश मुंढे (३०), अनिल सूर्यवंशी (२२) आणि जयदीप मुंढे (२६) या तिघांना अटक केली आहे.

Exit mobile version