Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अरे किती हे पुतळे ? – अजित पवार संतापले

बुलडाणा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी, जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा, आणि इतर ठिकाणी भेटी दिल्यात; दरम्यान ठिकठीकाणी उभारलेल्या पुतळ्यावरून ‘त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना खडसावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी, जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा, आणि इतर ठिकाणी भेटी दिल्यात.

दरम्यान, त्यांनी शहरातील दोन ठिकाणी जिजाऊ व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले. त्याचबरोबर राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्याने अजित पवार यांना पुन्हा हार अर्पण करण्यासाठी विनंती केली असता त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष नाझिर काजी आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना ‘किती हे पुतळे ?’ असा सवाल केला आणि ठिकठीकाणी उभारलेल्या पुतळ्यावरून त्यांनी एक प्रकारे स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.

 

Exit mobile version