Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळावा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र व एम सी सी जळगाव यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक ११ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यांत आलेले आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० व १२ वी / सर्व ग्रॅज्युएट धारक / आय.टी.आय सर्व ट्रेड धारक / सर्व डिप्लोमा धारक एकूण १०५ रिक्तपदे भरण्याविषयी कंपन्यांनी कळविले आहे.

सदरील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह मेळाव्याचे आयोजन शासकीय आय. टि. आय. मेस हॉल जळगाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुन ॲप्लाय करावा. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीसाठी हजर रहावे. तसेच विभागाच्या www.mahaswayam.gov.in/ www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी देखील करुन घ्यावी. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते संध्या ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि.रा. रिसे कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता जळगाव यांनी कळविले आहे.

Exit mobile version