Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आपत्तीजनक परिस्थितीत अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव प्रतिनिधी । मान्सून कालावधीच्या आपत्तीजनक परिस्थतीत २४ व २५ जुलै रोजी आपत्तीव्यवस्थापन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. आज शुक्रवार २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता निर्देशाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. 

दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सद्यस्थितीत मान्सुन कालावधी सुरू आहे. राज्यात आपत्तीची स्थीती निर्माण होत्याची शक्यता नाकारत येत नाही. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, महापूर तसेच दरड कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होऊन जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना  होत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक असून शनिवार २४ जुलै आणि रविवर २५ जुलै रोजी मुख्यालयी हजर राहावे व कोणत्याही सबबीखाली मुख्यालय सोडून नये असे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिव यांनी निर्देश दिल्यानंतर आज सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आपत्ती व्यवस्थापनाशी संबंबिधत अधिकारी व कर्मचारी यांना देखील मुख्यालय न सोडण्याचे लेखी सुचना देण्यात आले आहे. नेमून दिलेल्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांनी हजर राहण्याच्या आदेश आज शुक्रवारी २३ जुलै रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजित  राऊत यांनी काढले आहे.

 

 

Exit mobile version