Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महर्षी वाल्मिकींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ; शनी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जळगाव प्रतिनिधी । एका न्यूज चॅनलवर मुलाखतीत वाल्मिक ऋर्षी यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य करणाऱ्या संशयितावर कारवाई करण्यात यावी, याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक कैलास सोनवणे (वय-५२) रा. रिधुरवाडा यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, १८ ऑगस्ट रोजी नॅशनल न्यूज चॅनलवर संशयित आरोपी शायर मुनव्वर राणा याची अफगणीस्तान मुद्द्यावर मुलाखत सुरू असतांना त्याने वाल्मिक ऋषी यांच्याविरोधातील आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्यामुळे कोळी समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत. यासंदर्भात नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शनीपेठ पोलीस ठाणे गाठून संशयित आरोपी शायर मुनव्वर राण यांच्या विरोधात तक्रार दिली. पुढील तपास शनीपेठ पोलीस कर्मचारी करीत आहे. 

Exit mobile version