Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सोशल मीडियावर आक्षपार्ह पोस्ट : दोघांच्या विरोधात गुन्हा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका महापुरूषाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या दोन तरूणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील जानवे व रणाईचे येथील तरुणांनी एका महापुरुषाबाबत समाज माध्यमावर अत्यंत अश्लील भाषेत आणि आक्षेपार्ह टीका केली होती. या तरुणांवर काल अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. अट्रोसिटी व इतर कायद्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश बोरसे, रा. रणाईचे तालुका अमळनेर व आरोपी कल्पेश पाटील राहणार जानवे तालुका अमळनेर यांनी दि. ६ रोजी इंस्टाग्राम आक्षेपार्ह पोस्ट व कमेंट केली होती. एका महामानवाच्या बाबत ही पोस्ट व कमेंट करण्यात आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

या संदर्भात समाज बांधवानी अमळनेर पोलीस ठाणे गाठत संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार समाधान मैराळे यांच्या फिर्यादी वरून भारतीय दंड संहिता १८६० नुसार २९४ २९५ A, ५०४, ५००, ३ १ आर, ३१ यू, ३१ व्ही या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर हे करीत आहेत.

Exit mobile version