Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ शहरातील भारत नगर येथे गुन्ह्याच्या कामाच्या चौकशीसाठी चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला वीट मारून फेकत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ जगदीश जीवनसिंग ठाकूर रा. रेल्वे पोलीस कॉलनी भुसावळ हे सोमवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी विष्णू परशुराम पाथरोड रा. वाल्मिकी नगर, भुसावळ यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करण्यासाठी गेले होते. दरम्यान भुसावळ शहरातील भरत नगर येथील रेल्वे बोगद्याजवळ संशयित आरोपी विष्णू परशुराम पथरोड आणि त्याच्यासोबत असलेला जावेद तडवी रा. भरत नगर, भुसावळ या दोघांनी पोलिसाची धक्काबुक्की करत त्यांच्यावर वीट मारून फेकली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल जगदीश ठाकुर यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विष्णू परशुराम पथरोड रा.वाल्मिकी नगर आणि जावेद तडवी रा. भारत नगर या दोघांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

Exit mobile version