Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणीचा पाठलाग करत अश्लिल चाळे; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरुणीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने वारंवार तिचा पाठलाग करीत तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्याशी संबंध वाढविले नाही तर तुझ्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवेल व तुझ्या भावंडांना सुद्धा मारुन टाकेल, अशी धमकी या तरुणाने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत अधिक असे की, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक तरुणी शिक्षण घेत आहे. जून २०२२ मध्ये अक्षय अजय जयस्वाल (२३, रा. शिवाजीनगर, जळगाव ) या तरुणाने तिच्याशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने ओळख केली. त्यानंतर तिला मेहरुण तलाव येथे घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे केले. तसेच तरुणीचा सतत पाठलाग करीत असे. तरुणीने त्याच्याशी संबंध वाढविले नाही व घरी सांगितले तर तिच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आणि टोळी पाठवून भावांना मारुन टाकेल, अशी धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अक्षय जयस्वाल या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करत आहेत.

Exit mobile version