Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमित शहा, पर्रीकरांबद्दल फादरचे बेताल वक्तव्य : चर्चकडून माफी

Shah Parrikar

गोवा (वृत्तसंस्था) गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दल येथील एका पाद्रींने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर गोव्यातील ‘अवर लेडी ऑफ स्नोज चर्च’ ने आज एक पत्रक काढून जाहीर माफी मागितली आहे.

 

‘या चर्चचा फादर डीसिल्व्हा याने भाजपला मतदान करू नका, असं आवाहन ख्रिश्चन धर्मीयांना केले होते. हे आवाहन करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. अमित शहा हे सैतान आहेत तर, मनोहर पर्रीकरांवर परमेश्वराचा कोप झाल्यामुळंच त्यांना कॅन्सर झाला, असे अकलेचे तारे त्याने तोडले होते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चवर सर्वच स्तरातून जोरदार टीका होऊ लागली. एखादा धर्मगुरू अशी वक्तव्य कसे करू शकतो, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. अखेर चर्चने सोमवारी याबद्दल पत्रक प्रसिद्ध करून या वादावर पडदा टाकला आहे. मतदानाबद्दल जागृती करा, असे निर्देश सर्वच पाद्रींना चर्चकडून देण्यात आले आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भाविकांना मतदानास प्रवृत्त करा. त्यांना मतदानाचं महत्त्व पटवून द्या, अशा सूचना पाद्रींना देण्यात आल्या आहेत. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देऊ नका, असेही बजावण्यात आले होते. असे असतानाही डीसिल्वा याने थेट भाजपविरोधाची भूमिका घेतली होती.

Exit mobile version