Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत; राष्ट्रवादीचा निर्णय

मुंबई वृत्तसंस्था । ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतची न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे यावर चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत ठरले. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

पक्षातंर्गत होणार्‍या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय ज्या आगामी निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली असल्याचे बैठकीत सांगितले आहे.

Exit mobile version