Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने शेगाव येथे आज ओबीसी समाज अधिकार संमेलन घेण्यात आले.

या संमेलन मध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने इंपिरिकल डाटा उपलब्ध करून द्यावा, केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करावी तसेच देश पातळीवर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे, या सर्व विषयावर संमेलनामध्ये चर्चा करण्यात आली. या समेलना मध्ये छत्तीसगडच्या मुख्यमंत्री भुपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थिती लावली. राज्यात ओबीसी प्रश्नावर खूप मोठं वादंग सुरू आहे. राज्यसरकार ओबीसी समाजाच्या पाठीशी खंबीर उभे आहे. ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय पुढील निवडणुका होणार नसल्याचे सूतोवाच नाना पटोले यांनी केले.

शेगाव-ओबीसी आरक्षण व ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आज संत नगरी शेगाव येथील स्व. गजानन पाटील मार्केट यार्डमध्ये भव्य ओबीसी समाज अधिकार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात ओबीसींच्या विविध प्रश्न व मागण्यांबाबतचे ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आले. राज्यातील ओबीसी समाज बांधवांना राजकीय आरक्षण मिळावे तसेच विविध ज्वलंत प्रश्न सुटावे याकरीता ओबीसी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, राष्ट्र ओबीसी महासंघ, समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ आदींच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे आज २८ मार्च रोजी ओबीसी समाज अधिकार संमेलन पार पडले.

या संमेलनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, महिला व बाल विकास मंत्री ना.यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, एआयसीसीचे महाराष्ट्र सचिव आशिष दुआ, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, माजी आ.राहुल बोंद्रे, आ.राजेश एकडे, मा.आ.दिलीप सानंदा, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे, जयश्रीताई शेळके, श्याम उमाळकर, दत्ता खरात, कासम गवळी, रामविजय बुरुंगले, स्वातीताई बाकेकर, प्रकाश तायडे, नतिकोउद्दीन खतीब आदींची उपस्थिती होती. यावेळी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात मांडण्यात आलेल्या ठरावांना उपस्थित जनसमुहाने टाळ्या बाजवून सर्व समंती दर्शविली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ओबींसीच्या मागण्यांबाबत मार्गदर्शन केले. या संमेलनाला बुलडाणा, वाशिम, अकोला या तिन्ही जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version