Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओबीसीचे आरक्षण तिघाडी सरकारनेच घालवले – माजी मंत्री सदाभाऊ खोत

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारनेच घालवले, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत केला. ‘जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्रचा’ या अभियानानिमित्त चाळीसगाव येथे ते बोलत होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा अभियान २९ एप्रिल रोजी पासून कोकणातील सिंधुदुर्ग येथून सुरूवात झाली आहे. हा दौरा २१ जिल्हा पूर्ण केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगता करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सदर दौरा हा सोमवार, ९  रोजी चाळीसगाव शहरात येऊन धडकला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी निवासस्थानी दौऱ्यानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर पत्रपरिषद घेण्यात आली. यावेळी कोरोनाच्या काळात इतरांपेक्षा शेतकरी, कामगार व बारा बलुतेदार यांना जबर फटका बसला. हातातले कामे ठप्प झाल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. तर बहुतेकांनी आपली जीवन यात्रा संपवली. या काळात कष्टकरी कामगारांना सरकारच्या मदतीची गरज होती. परंतु हे सरकार प्रबोधन करण्यातच मग्न होती. तर दुसरीकडे राज्यात टिईटी, पोलिस व आरोग्य भरतीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला. हे राज्य सरकारचे अपयश असल्याचे सांगून ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारनेच घालवून दिल्याचे आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. पुढे विचारणा केली असता देशात जी महागाईचा भडका उडाला आहे. याला मी जाहीरपणे समर्थन करत असून महागाईने आणखी उच्चांक गाठायला हवा असे खोत यांनी सांगितले.

 

Exit mobile version