Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पौष्टिक आहार प्रात्यक्षिक आणि जनजागृती कार्यक्रम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वर्ल्ड व्हिजन इंडिया व आयसीडीएस यांच्या सहकार्याने पोष्टिक आहार प्रात्यक्षिक आणि त्याबद्दल जनजागृती कार्यक्रम कंडारी, साखरे, सार्वे गावात घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पोष्टीक आहाराचा डेमो केला व ते कडधान्य भाजीपाला कशा प्रकारे बनवायचा याबद्दल माहिती देण्यात आली.

प्रमुख पाहुणे सीडीपिओ संजय धनगर सरांनी सांगितले की, मुलांना काय आहार खाऊ घालायला पाहिजे. कुपोषण मुक्त मुले व गाव करायच असेल तर मुलांना पोष्टीक आहार खाऊ घालने गरजेचे आहे. त्यामध्ये कडधान्य, फळभाजी, पालेभाज्या, फळ या गोष्टीचा मुलांच्या जेवणात समावेश असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कार्यक्रमामध्ये सांगण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सीडीपीओ धरणगाव संजय धनगर उपस्थित होते.

तसेच संजय पाटिल, तसेच वर्ल्ड व्हिजन इंडिया प्रकल्प अधिकारी अनिल बल्लूरकर, सरपंच फारुक पटेल, कौशलबी बीलाल पटेल, पोलीस पाटील सुफियाबी असलम पटेल, मौलाना वाहिद इमाम पटेल, अंगणवाडी सेविका कमल अशोक माळी, अंगणवाडी मदतनीस भटाबाई बाबुराव पटेल, अशा वर्कर कल्पना ठाकरे, कृषी सखी रीना जाबाज पटेल, सीआरपी सपना हरून पटेल या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते.

तसेच सहकारी अंकिता मेश्राम, स्वयंसेवक रचना जाधव, रोहित पाटिल हे उपस्थित होते. तसेच वर्ल्ड व्हिजन मार्फत गावामध्ये ट्युशन क्लास घेतले जाते. त्यामधील मोलाचं काम करणारे REC शिक्षक धनंजय माळी, वैष्णवी माळी, अश्विनी माळी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये ऐकून २०० मुले व त्यांची आई उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट व आभर प्रदर्शन अंकिता मेश्राम प्रोग्राम कोओर्डीनेटर यांनी केले.

Exit mobile version