Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नुरुद्दीन मुल्ला यांना ‘बेस्ट सोशल वर्कर’ पुरस्कार

kasoda 1

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील कासोदा येथील मौलाना आजाद विचार मंचचे जिल्हा संघटक तथा भारतीय पत्रकार महासंघाचे तालुकाध्यक्ष नुरुद्दीन मुल्ला यांना 15 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगरातील रहनुमा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीतर्फे ‘बेस्ट सोशल वर्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यासंदर्भात माहिती अशी की, रहनुमा एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटीच्या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर प्राध्यापक शेख इस्माईल यांना पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शिवचरण उज्जैनकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवचरण उज्जैनकर हे होते. तसेच याप्रसंगी नुरुद्दीन मुल्लाजी सह अडावदचे फारूक शाह नोमानी (साहित्यिक), शेख जावेद (आदर्श शिक्षक), फारूक शाह, शेख जावेद, नुरुद्दीन मुल्लाजी व कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक व आभार संस्थेचे चेअरमन हकीम चौधरी यांनी मानले.

Exit mobile version