Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उमेश कोल्हे खून प्रकरणाचे नुपूर शर्मा कनेक्शन : सहा जण अटकेत

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माची पोस्ट शेअर केल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यातच आज पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी या संदर्भात नवीन माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला. त्यात प्रथमदर्शी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली त्याच संबंधाने हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न झालं आहे. एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.  या घटनेमागे कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हात आहे का याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (२२),  अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (२४), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), शोएब खान उर्फ भुर्‍या वल्द साबीर खान (२२), अतिब रशीद वल्द आदील रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version