जळगावात नाभिक संघातर्फे समाज बांधवांना किराणा किट वाटप (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा नाभिक संघ ट्रस्टच्या वतीने शहरातील नाभिक समाज बांधवांना मोफत किराणा साहित्याचे वाटप आज सकाळी ११ वाजता खेडीरोड परिसरात घेण्यात आला.

लॉकडाऊन काळात अनेकांना हाताला काम नाही. त्यात दुकाने बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. समाजात काहींना एका वेळेच्या जेवनाची सोय देखील होत नाही. जळगाव जिल्हा नाभिक समाज संघ ट्रस्टच्या वतीने आज खेडी रोड परीसरात समाजातील गरीब, गरजू, विधवा आणि सलून कारागिर असे २०० कुटुंबियांना जीवनावश्यक किराणा कीटचे मान्यवराच्याहस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कांतिलाल वाघ, जिल्हा उपाध्यक्ष नाना वाघ, जिल्हा सचिव जगन्नाथ वखरे, जिल्हा सहसचिव कृष्णा अहिराणे, जयदेव मावळे, संतोष खोंडे, अनिल तळेले, धनराज शिंदे, राजेंद्र शिरसागर, सुभाष वाघ, चिंतामण शिंदे, भरत खडके, ललित चौधरी, राजू खडके, जळगाव शहर अध्यक्ष संजय अहिरे, उपाध्यक्ष मनोज भिडे, संदीप वाघ, कार्याध्यक्ष रमेश शिंदे, सचिव गणेश शिंदे, सहसचिव विलास साळुंखे, विजय पर्वते, प्रतीक राऊत, राजू भिडे, भूषण शिंदे, लहू राऊत, शशिकांत राऊत, प्रवीण सोनवणे, ललित शिंदे, पवन बिडे, प्रकाश दांडेकर व बहुसंख्य समाज बांधव व भगिनी व सर्व पदाधिकारी यांना या कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक नाना वाघ, जगन वखरे यांनी केले आहे. आभार प्रदर्शन कृष्णा अहिरे यांनी केले आहे.

Protected Content