Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता आरटीओ कार्यालयात न जाता होणार कामे सहा सुविधा फेसलेस

मुंबईलाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसंस्था | फेसलेस सेवेचा शुभारंभ परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते परिवहन आयुक्त कार्यालयात आज संपन्न झाला. आता लायसन्स संबधीत कामासाठी आरटीओ कार्यालयात न जाता कामं करता येणार आहेत. परिवहन विभागात वाहनाच्या आणि लायसन्सच्या प्रत्येकी तीन अशा एकूण सहा सेवा आता फेसलेस होणार आहेत.

आरटीओ कार्यालयाच्या कामासाठी काही जण एजंटचा पर्याय स्वीकारत होती आता मात्र नागरिकांना घरबसल्या आपल्या अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे आपली आरटीओमधली काम करता येणार आहे. त्यासाठी आधार कार्ड आणि तो लिंक असलेला मोबाईल क्रमांक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. जवळपास लाखो लोकांच्या वर्षभरातील आरटीओच्या फेऱ्या वाचणार आहेत. पूर्वी या सुविधा ऑनलाइन होत्याच मात्र एकदातरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या व्यक्तीला आरटीओ कार्यालयात जावे लागत असे. मात्र या पुढे या सेवांसाठी आता आरटीओ ऑफिसमध्ये न जाता सर्व ऑनलाइनच होणार आहे.

 

खालील सेवा फेसलेस होणार

 

आरटीओमधील वाहनांच्या या सेवा –  

वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल

डुप्लिकेट आरसी बुक

स्थानांतर – noc

लायन्ससच्या या सेवा –

पत्ता बदल,

रिनीव्हल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स

डुप्लिकेट लायसन्स

Exit mobile version