Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता रिक्षा चालकांच्या माहितीचे स्टिकर्स असणारं रिक्षामध्ये

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वाहतूक सुरक्षा निमित्त शहरातील रिक्षचालक- मालक येणाऱ्या अडचणी व कायदेशीर नियमांचे पालन अशा विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी रिक्षात वाहन क्रमांक, परवानाधारकाचे नाव व रिक्षा चालकाचे नाव असलेलं   उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या हस्ते स्टिकर चिटकवून अभियानास  मंगलम हॉल येथे प्रारंभ करण्यात आला.

 

रिक्षाचालक व सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातला समतोल राखण्यासाठी वीर सावरकर रिक्षा युनियन व परिवहन विभाग – वाहतूक शाखा यांच्यामार्फत सुरक्षा सप्ताह राबिण्यात आला. याबाबत जनजागृती व  सामान्यांची  फसवणूक होणार नाही आणि प्रामाणिक रिक्षा चालकांवर अन्याय होणार नाही या अनुषंगाने स्टिकर्स वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

रिक्षामध्ये रिक्षा चालकाची असणार माहिती 

आता रिक्षा चालकांची  रिक्षामध्ये  माहिती असणार त्यामुळे प्रवासी वाहतूक मधील होणारे गैरसमज दुरुस्त होण्यास मदत मिळणार आहे.यात  माहिती पुढीलप्रमाणे –

वाहन परवानाधारक माहिती

१) वाहन क्रमांक –

२) परवाना धारक नाव –

३) चालकाचे नाव –

असणार आहे.

कार्यक्रम प्रसंगी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी नियमावली सांगितली व रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले.

तसेच रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी देखील वाहतूक जनजागृती राबवून रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूक करताना होणारा नाहक त्रास व नागरिक समस्या या सस्येबाबत निवारण करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविले आहे व मोलाचे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पदमसिद्ध ऑटो संचालक संजय खैरनार, रज्जाकभाई, सहा.मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश महाले, मोरेश्वर साखरे, निलेश झाडे  उपस्थित होते सूत्रसंचालन  सुनीता मराठे यांनी केले.  यावेळेस शहर वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक सैय्यद मुजफ्फर अली,  महीला पोलीस मेघना जोशी उपस्थित होते.   यशस्वितेसाठी वीर सावरकर रिक्षा युनियन मार्फत परिश्रम घेण्यात आले.या वेळी युनियनचे पदाधिकारी व सदस्य – पोपट ढोबळे,कैलास विसपुते, पिंटू भोस, वाल्मीक सपकाळे,अशोक चौधरी, एकनाथ बारी, शशी जाधव ,विलास ठाकूर,बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version