आता दस्त नोंदणीसाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल आवश्यक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील नागरिकांना आता दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येतांना 48 तासाचे आतील आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच दस्त नोंदणीस उपस्थित राहता येईल.

निगेटिव्ह चाचणी अहवाल असल्याशिवाय नागरीकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी गर्दी करु नये. तसेच सह जिल्हा निबंधक वर्ग-1 जळगाव कार्यालयातही विनाकारण गर्दी करु नये. कोविडपासुन आपले तसेच इतरांचे संरक्षण होण्यासाठी नागरीकांनी शासनाच्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जळगावचे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय भालेराव यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये केले आहे.

Protected Content