Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता पाकव्याप्त काश्मीरच टार्गेट : राजनाथ सिंह

rajnath singh

कालका, वृत्तसंस्था | आता पाकिस्तानशी जी पण चर्चा होईल, ती पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होईल. असा खुलासा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो, असा इशाराही सिंह यांनी यावेळी दिला आहे.

 

काश्मीरसंदर्भात पाकने भारताशीच चर्चा करावी, अशी भूमिका अमेरिकेने मांडली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी जी चर्चा होईल, ती पाक व्याप्त काश्मीरवर होईल असे राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितले आहे. येथील प्रचारसभेमध्ये त्यांनी पाकिस्तानचा चांगलाच समाचार घेतला. ‘पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला थारा देत राहील, तोपर्यंत त्यांच्याशी कोणतीच चर्चा होणार नाही. येत्या काळात चर्चा झालीच तर ती पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर होईल, इतर कोणत्याही मुद्द्यावर होणार नाही’.

तसंच कलम ३७०च्या मुद्द्यावरून पाकिस्तान जगभर जातोय, अनेक देशांची मदत मागतोय, पण कोणीच त्यांना मदत करत नाहीये. अशी माहितीही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली आहे. आम्ही घोषणापत्रात जी वचने दिली होती, ती सगळी पाळतो आहोत. आम्ही कायम देशहिताची, देशनिर्मितीचे राजकारण करतो असेही यावेळी राजनाथ सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ‘देश स्वतंत्र झाला तरी काश्मीरचा मुद्दा तसाच राहिला. दोन्ही देशांकडे संविधान असूनही हा तिढा सुटलेला नाही.

Exit mobile version