…आता राष्ट्रवादी पक्ष विस्तारासाठी काम करेन- माजी मंत्री एकनाथराव  खडसे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | ज्या भाजपच्या वाढीसाठी अपार मेहनत घेतली, गेली ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो. पण अन्याय होत असल्याचे पाहून नाईलाजास्तव राष्ट्र्वादित आलो. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास टाकल्यानुसार आता राष्ट्रवादी पक्ष विस्तारासाठी काम करणार असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

विधान परिषदेची निवडणूक २० जून रोजी आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने त्यांचे उमेदवार बुधवारी जाहीर केले आहेत. तर आज सकाळी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा करीत रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत दिली आहे.
यावर एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेत, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. विधान परिषदेसाठी माझे नाव राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्याबद्द्ल मी त्यांचे अभिनंदन करतो. गेली ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम केले, विधान परिषदेसाठी आश्वासन दिले, पण बऱ्याच वेळा अन्याय झाला, अशी भावना निर्माण झाली. त्यानंतर अशा अनेक प्रसंगामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये यावे लागले. लागलं. शरद पवार यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास सार्थ करेन आणि ज्या भागात भाजपा वाढीसाठी उभे आयुष्य काढले त्या भागात राष्ट्रवादी पक्ष वाढविणार,’ असे माजी मंत्री खडसे म्हणाले.

Protected Content