Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता राहुल गांधींच्या जीवनावरही चित्रपट 

मुंबई (प्रतिनिधी) माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरही चित्रपट येत आहे. ‘माय नेम इज रा गा’ असे या चित्रपटाचे नाव असून त्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.

टीझरमध्ये दाखवल्यानुसार, चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दृश्यापासून होते व शेवट २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात होते. मूळचे पत्रकार असलेल्या रूपेश पॉल यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. राहुल गांधी यांचे बालपण, अमेरिकेतील विद्यार्थी जीवन आणि राजकीय वादविवादांचे चित्रण यात करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना रूपेश पॉल म्हणाले, ‘माझा कोणत्याही नेत्याशी काहीही संबंध नाही. या चित्रपटासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. कारण, हा चित्रपट वास्तव परिस्थितीवर आधारित आहे. त्यात जे काही दाखवण्यात आलंय ते जगजाहीर आहे. ‘माय नेम इज रा गा’मध्ये अश्विनी कुमार याने राहुल गांधींची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर, मोदींच्या भूमिकेत हिंमत कपाडिया आहेत.

Exit mobile version