Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता अनिल परब यांचा नंबर ! : सोमय्यांचा दावा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडी सरकारमधील अनिल परब यांचा नंबर आता लागणार असल्याचे ट्विट भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सोमय्या यांनी आधी देखील अनिल परब यांच्यावर आरोपांची सरबत्ती केली होती. बजरंग खरमाटे नावाचा आरटीओ अधिकारी परबांचा ’वाझे’ आहे, असं सोमय्यांनी म्हटलं होतं. आता सोमय्यांनी आणखी एक ट्वीट करत महाविकास आघाडीतील चौथ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यात त्यांनी अनिल परब यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.

सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधित बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परबांचे बंगले असल्याचं सांगितलं. याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. सोमय्यांनी ट्वीट करत परबांच्या रिसॉर्टचा फोटो टाकला आहे.

कोकणातील बेनामी रिसॉर्ट, काळा पैसा आणि अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात अनिल परब यांच्याविरोधात केंद्र सरकारने तक्रार दाखल केल्याचं सोमय्यांनी सांगितलं. याची दापोली कोर्टात ३० मार्चला सुनावणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांची वक्रदृष्टी अनिल परब यांच्याकडे वळणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 

Exit mobile version