Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात रिक्षा चालकांचे लोळण घेत आंदोलन ( व्हिडीओ )

riksha aandolan

भुसावळ प्रतिनिधी । आरटीओ अधिकारी व एजंटांकडून त्रास होत असल्याचा आरोप करून आज रिक्षा चालकांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लोळण घेऊन आंदोलन केले.

याबाबत वृत्त असे की, पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील रिक्षा चालकांनी आरटीओ अधिकारी आणि एजंटांच्या मनमानीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. या अनुषंगाने आज प्रांताधिकारी कार्यालयासमोर लोळण घेऊन जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला. रिक्षा चालकांना होणारा त्रास कमी व्हावा अशी आपली मागणी असून यासाठी सुरू असलेला लढा तीव्र करण्यात येईल असा इशारा जगन सोनवणे यांनी याप्रसंगी दिला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रांताधिकार्‍यांना निवेदनदेखील देण्यात आले.

Exit mobile version