Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात अनलॉकचे नोटिफिकेशन जारी : जाणून घ्या पूर्ण माहिती

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याचे निर्देश नोटिफिकेशनच्या माध्यमातून जारी केले आहेत. जाणून घ्या याची अचूक माहिती.

काल राज्य सरकारने निर्बंध शिथील करण्याचे संकेत दिले होते. यानंतर सायंकाळी एका जीआरच्या माध्यमातून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. यानंतर आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यात खालील प्रकारे नवीन नियम असणार आहेत.

१) राज्यातील सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असून रविवारी मात्र सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अर्थात, दुकानदारांना पाच दिवसांमध्ये वाढीव वेळेसह शनिवारी अर्ध वेळ दुकाने उघडता येणार आहेत.

२) राज्यातील सर्व उद्याने बगिचे आदींना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

३) सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये हे कर्मचार्‍यांच्या पूर्ण क्षमतेसह सुरू राहणार आहेत.

४) कृषी, उद्योग, स्थापत्य आदी क्षेत्रांना आधीप्रमाणेच पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे.

५) सलून, स्पा आदी दुकानांना ५० टक्के क्षमतेसह रात्री आठ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

६)सिनेमागृहे (मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन); नाट्यगृहे, थिएटर्स आदींना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.

७) राज्यातील सर्व देवस्थांना सुध्दा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

८) शाळा व महाविद्यालयांबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड तसेच टेक्नीकल बोर्डचे नियम लागू राहतील.

९) हॉटेल आणि उपहारगृहे हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतात.

 

१०) राजकीय, सामाजिक कार्यक्रम, अंत्यसंस्कार, जाहीर कार्यक्रम आदींसाठी आधीचेच निर्बंध लागू राहतील.

 जळगाव जिल्ह्यात काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आलेले असून नागरीकांनी चेहऱ्यावर मास्क लावणे, सॅनिटाईजरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि शासनाने दिलेल्या निर्गमित केलेले नियमांचे पालन करण्याचे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रूपये दंड आकारण्यात यावी अश्या सुचना पोलीस विभागा आणि महापालिका यांना देण्यात आले आहे. 

 

Exit mobile version