Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहर व परिसरातील घरकाम करणार्‍या महिला, रिक्षा चालक, विविध खाजगी कंपनी मध्ये काम करणारे रोजंदार यांच्या एकूण ११२० पाल्यांना केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘आम्हालाही शिकायचे आहे’ या उपक्रमांतर्गत वह्यांचे वाटप करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे अनेक जणांचे रोजगार गेले आहे याची सर्वात मोठी झळ घरकाम करणार्‍या महिला, रिक्षा चालक, विविध खाजगी कंपनी मध्ये काम करणारे रोजंदार यांना बसली आहे. त्यातच पाल्यांच्या ऑनलाईन शाळा सुरु झाल्या आहेत. एकीकडे रोजगार उपलब्ध नाहीत व त्यातच पाल्यांचा शैक्षणिक साहित्याचा खर्च या समस्या उद्भवल्या. त्यावर पर्याय म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आम्हालाही शिकायचे आहे या उपक्रमांतर्गत वह्यांचे वाटप करण्यात आले.

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसर, हरीविठ्ठल नगर, खंडेराव नगर, त्रिभुवन कॉलनी, कांचन नगर, शनिपेठ, चांभार वाडा, बळीराम पेठ, पिंप्राळा, फातिमा नगर, समता नगर, रामानंद नगर सह कुसुंबा, आव्हाणे, ममुराबाद भागातील ११२० विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप प्रत्यक्ष त्या त्या भागात जाऊन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य तर मिळालेच आहे सोबत शिक्षणाचा आर्थिक भार देखील कमी होण्यास मदत झाली.

या उपक्रमास समाजातील विविध मान्यवरांनी सहयोग दिला. वही वाटप करण्यासाठी श्रीकांत वाणी, पुंडलिक पाटील, संजय नारखेडे, नंदु जंगले, हरीश यादव, ज्ञानेश्‍वर पाटील, सतिश मदाने, नितीन चौधरी, सौ मनिषा खडके, वैशाली महाजन, रेवती शेंदुर्णीकर यांचेसह प्रा. सौ. मुग्धा राव, प्रमोद मोघे, रवि लढ्ढा, सुभाष पाटील यांनी सहयोग दिले.

Exit mobile version