Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध बलात्कार नाही ; सुप्रीम कोर्ट

1484912949 6Ar3oc Supreme Court ABP
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर यामध्ये बलात्काराचा गुन्हा होवू शकत नाहूी. एका याचिकेवर असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिलेने केला होता. या याचिकेवर सनावणी करत असताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

 

सीआरपीएफमध्ये डेप्युटी कमाडंट असलेल्या अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप विक्रीकर विभागातील सहायक आयुक्त महिलेने केला होता. तक्रारदार महिला सीआरपीएफमध्ये असलेल्या या अधिकाऱ्याला १९९८पासून ओळखत होती. त्याने २००८ मध्ये लग्नाचे आश्वासन देत बळजबरीने संबंध प्रस्थापित केले, असा आरोप या महिलेने केला आहे. २०१६ पर्यंत दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दरम्यानच्या काळातही दोघे एकमेकांच्या घरी थांबायचे. दरम्यान, ‘२०१४मध्ये अधिकाऱ्याने जातीचा अडसर येत असल्याचे कारण देऊन लग्नास नकार दिला. त्यानंतरही २०१६पर्यंत दोघांमध्ये शारीरिक संबंध होते,’ असे तक्रारदार महिलेचे म्हणणे होते.

 

2016 पर्यंत या दोघांचेही चांगले संबंध होते. हे दोघेही अनेक कारणास्तव भेटत होते. हे दोघेही अनेक ऐकमेकांच्या घरी थांबत असतं. या दोघांत जात एकसारखी नसल्यामुळे लग्न होवू शकणार नाही, असे या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. म्हणून या महिलेने याचिका दाखल केली होती. या दोघांच्यात 8 वर्षापासून शरीरसंबंध होते परंतु हे दोघांच्याही संमतीने होते. यामुळे या याचिकेत बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही. असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. लग्नात अनेक अडचणी येवू शकतात. त्यामुळे हा गुन्हा होवू शकत नाही. असा विकाल देण्यात आला आहे.

Exit mobile version