Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात नाक, कान व घसा शिबिर ; ९ रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय रूग्णालयात औषधीसह सवलतीच्या दरात नाक, कान व घसा शस्त्रक्रिया शिबिरात पहिल्याच आठवडयात ९ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्यस्थीतीला गावोगावी नाक-कान-घसा तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे.

जेणेकरुन रुग्णांना आपल्याच गावात आपली समस्या दाखवून मोफत तपासणी करुन घेणे शक्य होत आहे, कोविडमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहे परिणामी शारिरीक समस्यांसाठी डॉक्टरांकडे जाणे टाळले जात आहे. मात्र या शिबिरांमुळे प्राथमिक तपासणीसाठी रुग्ण आवर्जुन शिबिरात येत आहे. त्यातून पुढच्या उपचारासाठी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात येण्याचा सल्‍ला दिला जात असून येथे सवलतीच्या दरात औषधींसहीत शस्त्रक्रिया केली जात आहे. त्यात कानाचा पडदा बदलणे, नाकाचे हाड वाढणे, नासूर, नाकातील कोंब, टॉन्सील व कानाचे सडलेले हाड काढणे या प्रकारच्या शस्त्रक्रिया डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात होत आहे.

सदयस्थितित नाक कान घसा आजाराचे ७ तर म्युकोरमायकोसिस आजाराचे रूग्ण दाखल असून उपचार घेत आहे. याकरीता डॉ.पाटील रुग्णालयात नाक-कान-घसा तज्ञ डॉ.विक्रांत वझे, डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.पंकजा बेंडाळे यांच्यासह डॉ.हर्षल महाजन, डॉ.श्रृती खंडागळे हे सेवा देत असून भुलतज्ञ डॉ.दिनेश लालवाणी, डॉ.शितल ढाके यांचे सहकार्य लाभत आहे. दुखणे मेंदूपर्यंत गेल्यास धोक्याची तीव्रता वाढते नाक-कान-घसा ह्या इंद्रियांचा संबंध सरळ मेंदूशी येतो, जर ह्या इंद्रियांमध्ये काही बिघाड झाला असेल, समस्या उद्भवली असेल तर ती प्राथमिक पातळीवरच उपचार देवून बरी करता येवू शकते, मात्र जर दुखणे मेंदूपर्यंत गेल्यास गुंतागुंत वाढते परिणामी मृत्यूची होण्याचीही शक्यता असते, गेल्या आठवडयात मेंदूपर्यंत इन्फेक्शन पोहचलेल्या रूग्णावर वेळीच उपचार झाल्याने धोका टळला. यामुळे आता सवलतीच्या दरात औषधींसह शस्त्रक्रिया रुग्णालयात केल्या जात असून रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा. – डॉ.अनुश्री अग्रवाल, नाक- एम एस कान-घसा विभाग एकाच छताखाली होता येत उपचार कोविडमुळे अनेकांची आर्थिक परिस्थीती खराब झाली आहे, त्यामुळे आपल्या व्याधींसाठी रुग्णालयात जाणे टाळले जात आहे मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे गावागावात शिबिरे घेतली जात असून त्यातून पुढील उपचार सवलतीच्या दरात रुग्णालयात केली जात आहे, जेणेकरुन एकाच छताखाली आवश्यक रक्‍त-लघवीच्या चाचण्यांसह संपूर्ण उपचारांची सुविधा आहे, यामुळे रुग्णांना वेळीच उपचार दिले जात आहे. – डॉ.विक्रांत वझे, डी.एन.बी नाक-कान-घसा विभाग घरगुुती उपचार टाळा सवलतीच्या दरात मिळणार्‍या सुविधा सदयस्थीतीत नाक कान घसा आजारावर घरगुती अजार टाळणे गरजेचे आहे. डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात कान-नाक-घशाशी संबंधित शस्त्रक्रिया या १० ते १५ हजार या सवलतीच्या दरात करण्यात येतात. त्यात रुग्णालयातील लॅबमध्ये रक्‍त, लघवी तपासणी तसेच डॉक्टर फी, शस्त्रक्रिया तसेच दुर्बिणव्दारे तपासणी व एका टाक्यात शस्त्रक्रिया होत असल्याने दुस—याच दिवशी घरी पाठवले जाते. हे उपचार डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सवलतीच्या दरात तर खाजगी इस्पीतळात त्याचा खर्च २५ ते ४० हजारापर्यंत येवू शकतो व येतो.

डॉ पंकजा बेंडाळे (डी एल ओ नाक कान घसा)

 

 

 

Exit mobile version